Share

Aurangabad : मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेपूर्वीच राडा; पाणी प्रश्नांवर निवेदन देणाऱ्या भाजप नेत्यांना अटक

Published On: 

औरंगाबाद : थोड्याच वेळात ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोठी घडामोड झाल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद शहरात सध्या पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. या संदर्भातच भाजप पदाधिकारी निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहे, त्यासमोर थांबले होते. मात्र पोलिसांनी आता भाजप नेत्यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सभेपूर्वी कोणताही राडा होऊ नये, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ‘संभाजीनगर’ नामांतर वादावरून विरोधकांनी सेनेवर तोफ डागला असल्याचे दिसून येत आहे. मात्र सभा सुरु होण्यापूर्वीच एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे आजच्या सभेत शिवसेनेच्या मंचावर छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे नामांतराबाबत मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jali) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित १५ मुद्द्यांवर भाषण करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद येथे ८ जून रोजी पूर्वनियोजित सभेत आपण नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे मंदिर-मस्जिद , हिंदु-मुस्लिम , औरंगाबाद- संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टिका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभुल न करता औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेले मुलभुत सुविधेची कामे , प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करावा. अशी मागणी इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!