Share

Imtiyaz Jaleel । औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध – इम्तियाज जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आम्ही काही औरंगजेबचे भक्त नाही, मात्र औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की शिवसेना वाले म्हणतात की संभाजी महाराज आमचा बाप आहे, तर मग औरंगजेब तुमचा बाप आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा घाट हा मोठी शिवसेना लहान शिवसेना आणि भाजप यांचे हे नियोजन आहे.

मात्र या निर्णयामुळे औरंगाबादकरांचे विचार लक्षात घेण्यात आलेले नाही. शहरात एखादी दारूची दुकान सुरू किंवा बंद करायची असेल तर निवडणूक घेतात मग हा तर औरंगाबादकर यांचा जिवाभावाचा प्रश्न आहे. यासाठीही राज्य सरकारने निवडणूक घ्यावी त्यानंतर जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर सर्व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बदल करण्याचा खर्च उद्धव ठाकरे देणार आहे का? आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट, हे सर्व बदल करावे लागणार याचा खर्च कोण करणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उभा केला आहे. शिवसेना भाजप यांच्या वतीने औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाला विरोध करत असताना धमक्या देण्यात येत असून मात्र आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही असाही इशारा यावेळी खासदार जलील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. आजच्या मूक मोर्चा मध्ये मी खासदार म्हणून नाही तर औरंगाबादचा एक सामान्य नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याची ही भावना त्यांनी यावेळी माध्यमांची बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!