Share

‘या’ तारखेनंतर धो-धो बरसणार मान्सून; वाचा सविस्तर माहिती

Published On: 

मुंबई :  शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र मान्सून राज्यात उशिरा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सूनने पहिल्यांदा केरळमध्ये २९ मे ला हजेरी लावली होती.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुननंतर देशातील अनेक भागात मान्सून बरसणार आहे. उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना आता अजून एक आठवडा पावसाची वाट पहावी लागणार आहे. कृषी तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये कमीत कमी १००० मिलीमीटर पाऊस झाला तरच पेरणी करावी.

केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होईल असा अंदाज हवामान विभागाचा होता. मात्र, दरवर्षी ७ जूनला बरसणारा मान्सून अजूनही दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मान्सून लवकर येईल असा हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!