मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जावून भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधून नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे.
नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ज्याप्रकारे आमदारांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं जात आहे, मारहाण केली जात आहे ही गोष्ट लपलेली नाही. एका आमदाराला ५० कोटी देण्याचा प्रयत्न झाला. घोडेबाजार सुरु आहे. यावर आमचं लक्ष असून आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे”.
बंडखोर नेत्यांची मंत्रीपद काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय –
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –


