मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. याबाबतीती सलमान खानेन सोमवारी आपला जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिस तिहार तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. या चौकशीमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. सलमान खान आणि त्याचे वडील यांना मी धमकीचे कोणतेही पत्र पाठवले नाही. अशी माहिती लॉरेन्स बिश्नोईने दिली आहे.
सलमान खानचे वडील मॉर्निंग वॉकला गेले असता ते बसतात त्या बाकड्याजवळ धमकीचे पत्र बॉडीगार्डला मिळाले. त्या पत्रामध्ये तुमचा पण सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमान खानचा जवाब नोंदवला आहे. यावेळी लॉरेन्स बिश्नोईवर संशय येत असल्यामुळे तिहार तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यात आली, मात्र याबाबत मला काहीच माहित नाही असं उत्तर बिश्नोईने पोलिसांना दिले.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. २०१८ मध्ये जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हापासून हा चर्चेत आलेला आहे. तो पंजाबच्या अबोहर भागात राहतो. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना निवडणुकीला उभा राहिला होता. पण निवडणुकीत पराभव झाल्यावर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याची गुन्हेगारी क्षेत्रात सुरवात झाली.
महत्वाच्या बातम्या :


