औरंगाबाद : थोड्याच वेळात ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ‘संभाजीनगर’ नामांतर वादावरून विरोधकांनी सेनेवर तोफ डागला असल्याचे दिसून येत आहे. मात्र सभा सुरु होण्यापूर्वीच एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे आजच्या सभेत शिवसेनेच्या मंचावर छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे नामांतराबाबत मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “सभेत संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण समाजवादी आणि एमआयएम पक्षाचे मतदान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हवे आहे यासाठी संभाजीनगरचे नामांतरची घोषणा मात्र आजच्या सभेत कलानगरचे टोमणे सम्राट सर्किट करूच शकत नाहीत. सत्तेसाठी किती ही लाचारी.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jali) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित १५ मुद्द्यांवर भाषण करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद येथे ८ जून रोजी पूर्वनियोजित सभेत आपण नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे मंदिर-मस्जिद , हिंदु-मुस्लिम , औरंगाबाद- संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टिका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभुल न करता औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेले मुलभुत सुविधेची कामे , प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करावा. अशी मागणी इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- कोहलीसोबतच्या विनोदावर बोलताना प्रदीप सांगवानने सांगितले की, ” विराट रडला आणि रात्रभर…”
- “अपक्ष आमदार आमच्या पाठीशी, धनंजय महाडिकांचा विजय होणार” ; आठवलेंचा विश्वास
- ‘भूल भुलैया २’च्या १५० कोटींपैकी तुला किती मिळाले? ; कार्तिक आर्यनला चाहत्याचा प्रश्न
- राणा दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल, पुढील सुनावणी 16 जूनला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

