🕒 1 min read
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये बंगाल आणि झारखंड यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात इतिहास रचत बंगालने ७ बाद ७७३ धावा करून डाव घोषित केला. यानंतर बंगालने शानदार गोलंदाजीच्या बळावर झारखंडला २९८ धावांत गुंडाळल्यानंतर संघाने पहिल्या डावात ४७५ धावांची मोठी आघाडी घेतली. या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरले ते बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी, ज्यांनी पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. या खेळीच्या जोरावर बंगालच्या संघाने दुसऱ्या डावात ३०० हून अधिक धावा केल्या आणि आघाडी ८०० धावांच्या जवळ नेली.
राज्याचे क्रीडामंत्रीपद मिळालेले आमदार उपांत्यपूर्व फेरीसारखा महत्त्वाचा सामना खेळायला गेल्याचे रणजी ट्रॉफीच्या इतिहासात यापूर्वी दिसले नाही. मात्र बंगाल राज्याचे क्रीडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने संघासाठी हा महत्त्वाचा सामना तर खेळलाच पण दोन्ही डावात दमदार फलंदाजीही केली. पहिल्या डावात मनोजने १७३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याने १३६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने या शतकिय खेळीत ७८ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावा पूर्ण केल्या. यानंतर १५२ चेंडू खेळून त्याने १४ चौकार आणि १ षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. मनोजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २८ वे शतक होते.
1⃣0⃣0⃣ up for Manoj Tiwary as Bengal move closer to 240 in the second innings. #RanjiTrophy | #QF1 | #BENvJHA | @Paytm
Follow the match ▶️ https://t.co/UDFkFRkMjB pic.twitter.com/L65QSkUgu8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 10, 2022
बंगालचा पहिल्या डावात ७७३ धावा केल्यानंतर डाव घोषित
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगालने ७ बाद ७७३ धावांवर डाव घोषित केला. बंगालसाठी सर्व ९ फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सुदीप घारामीच्या १८७ आणि अमोल मजुमदारच्या ११७ धावा वगळता उर्वरित ७ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती. प्रत्युत्तरात झारखंडचा संघ केवळ १९८ धावा करू शकला. बंगालने पहिल्या डावाच्या जोरावर ४७५ धावांची मोठी आघाडी घेतली होती.
आधीच तीन उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत
रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे तीन उपांत्य फेरीचे संघ आधीच निश्चित झाले आहेत. उत्तर प्रदेशने कर्नाटकचा ५ गडी राखून आणि मध्य प्रदेशचा १० गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मुंबईने उत्तराखंडवर ७२५ धावांनी मात करून ऐतिहासिक विजय नोंदवला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
