Share

‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर अक्षयचा येतोय नवीन चित्रपट; निर्मात्यांच १०० कोटींच नुकसान

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आता या चित्रपटाचे शो चक्क रद्द करण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या निर्मात्यांना चांगलाच फटका बसला आहे. निर्मात्यांच १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. नंतर शनिवारी १२.६० कोटी आणि  रविवारी १६.१० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालेल अशी शक्यता दर्शवली होती पण. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशजनक कामगिरी केली आहे.

अक्षय कुमार मिळालेल्या अपयशानंतरही थांबला नाही. त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. अनन्या पांडेसोबत अक्षय चित्रपट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या पेक्षा ३१ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत अक्षय चित्रपट करणार आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि अनन्या पांडेची निवड करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!