Share

क्रिकेट सामन्यात घडलेला ‘हा’ किस्सा पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : इतर खेळांच्या बाबतीत क्रिकेट खेळाने जगभरावर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. दिवसेंदिवस लोकांमध्ये क्रिकेटबाबत प्रेम वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये विविध क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या जातात. या स्पर्धांना लाखो चाहत्यांचा प्रतिसादही मिळतो. तर अनेक देश क्रिकेट खेळाकडे आता वळताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेला किस्सा लगेचच व्हायरल होतो. असाच एक गंमतीशीर किस्सा युरोपमधील चेक रिपब्लिक देशात घडला. क्रिकेटचे उगमस्थान असलेल्या युरोपमधील चेक रिपब्लिक देशात युरोपियन लीग सिरीज सुरू होती. यावेळी स्टम्पिंगचा फसलेला प्रयत्न त्यानंतर धावबाद करण्याची दवडलेली संधी, या सर्वांचा परिपाक म्हणून एकाच चेंडूवर फलंदाजाच्या बॅटला चेंडू न लागता मिळालेल्या ३ धावा असा नाट्यमय प्रकार घडला. या सर्व नाट्यमय घडामोडींचा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

हा सामना विनोहर्ड क्रिकेट क्लब आणि प्राग बार्बेरियन्स यांच्यात झाला. या सामन्यावेळी विनोहार्डीच्या खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना सादर केला. याचा फायदा उचलत प्रागच्या स्टम्पिंग होता होता वाचलेल्या फलंदाजांनी ३ धावा वसूल केल्या.

युरोपियन क्रिकेटने हा गंमतीशीर व्हिडिओ शेअर करत त्याला ‘काहीही न करता त्यांनी तीन धावा चोरल्या.’ असे कॅप्शन दिले. हा गंमतीशीर घटनाक्रम होत असताना समालोचन करणाऱ्यांनाही हासू आवरले नाही. प्राग बार्बेरियन्सने हा सामना ६ धावांनी जिंकला. खराब हवामानामुळे सामना प्रत्येकी ३ षटकांचा केला होता. प्राग बार्बेरियनने २ फलंदाजांच्या मोबदल्यात २४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विनोहर्डला फक्त ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १८ धावा करता आल्या. ग्रुप बी मध्ये बार्बेरियन्स ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर विनोहर्ड ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!