🕒 1 min read
मुंबई: कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील. असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांची पोस्ट रिपोस्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंची हत्यासत्र कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी काश्मीरमध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
“शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या दिवंगत राहुल भट आणि दिवंगत रजनी बाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबांना आणि काश्मिरी पंडितांना सांगितले की, महाराष्ट्र काश्मिरी पंडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Shiv Sena MP @priyankac19 ji met with the families of late Rahul Bhat & late Rajni Bala, who were victims of terrorist attacks in Kashmir.
She conveyed to the families, and to Kashmiri Pandits, that Maharashtra stands firmly with, and with open doors, to Kashmiri Pandits. https://t.co/vfOuGh0xAJ— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 9, 2022
दरम्यान कश्मीर मधील परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादच्या सभेत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यातच आता शिवसेना नेते प्रत्यक्ष काश्मीर मध्ये जाऊन तेथील कुटुंबियांना धीर देत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर अक्षयचा येतोय नवीन चित्रपट; निर्मात्यांच १०० कोटींच नुकसान
- राज्यसभा निवडणूक संदर्भात जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- “भाजपने कितीही दावे केले तरी…” ; जयंत पाटलांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया
- IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पराभवाची आहेत ‘ही’ तीन मुख्य कारणं; वाचा!
- महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार आणि भाजपाचे उमेदवार पडणार – यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
