मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून अपक्ष उमेदवारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निकालावरून कळेल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, “भाजपने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. याचिकेचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा, अशी अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.”
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत 42 मतांऐवजी विजयासाठी 41 मतांची गरज आहे. कारण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान करता येणार नाही. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

