Share

“…नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे”- प्रियंका गांधीची भावनिक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला उद्देशून एक संदेश दिला. उत्तर प्रदेशसहित मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर पंजाबची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाणार आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे. नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. “राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतानाही तुम्ही ज्याप्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटिबद्ध राहिलात, याचा मला खूप अभिमान आहे,” असे प्रियंका गांधी म्हटल्या आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रभारी राहिलेल्या प्रियंका गांधी यांनी हा जनतेने दिलेला निकाल असून आपण आणि आपला पक्ष त्याचा आदर करेल, असंही सांगितले आहे.

“जनादेशाचा आदर करत देश व राज्याप्रती निष्ठा व समर्पण भावनेने लढा सुरू ठेवण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आपला लढा नुकताच सुरू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. सोमवारी प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाने जितका देता येईल तितक्या जोमाने लढा दिला असून निकालाची वाट पाहू असे म्हटले होते. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजप २६८ जागांवर आघाडीवर आहे, तर सपाला १२४ जागांवर आघाडी मिळाली आहे. परंतु काँग्रेसला केवळ ३ जागा मिळणार असल्याची चिन्ह आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!