🕒 1 min read
उत्तर प्रदेश : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आपली लढाई आता सुरु झाली आहे, निराश होऊ नका, असे म्हंटले आहे.
एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला.निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे. नव्या ऊर्जेने आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, उत्तर प्रदेशसह मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडे सत्ता जाण्याची चिन्हं दिसून येत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
