🕒 1 min read
Uddhav Thackeray मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे दोघे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधलाय. मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा, असे ते म्हणाले. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, त्यातल्या सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी. असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? असा सवालही त्यांनी मुंबईकरांना केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपल्या वाढदिवसादिवशी एक वेगळं गिफ्ट मागितलं आहे. वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : “हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत”; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल
- Sanjay Raut : “…हा तर खोटारडेपणाचा कळस”, संजय राऊतांचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर पलटवार
- MNS : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ ; मनसे नेत्याचं सूचक ट्विट
- Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक
- Mahesh tapase | तुम्ही नगरविकास मंत्री होता, तेव्हा मुंबई शहर खड्डे मुक्त का नाही केले? – महेश तपासे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
