Share

Uddhav Thackeray : “भाजपाला एक तर शिवसेना संपवायचीय आणि ती संपवताना त्यांना ठाकरे…” ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडत आपला वेगळा गट तयार केला. यानंतर राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरु झाला. शिंदे गटातील आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला निशाण्यावर धरलं. तर बंडखोर आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी नक्को म्हणून बंड केल्याचं कारण सांगत आहेत. तसेच शरद पवार यांना शिवसेना संपवायची आहे, असे आरोप राजकीय वर्तुळात होत होते. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, भाजपाला एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईवर असलेला शिवसेनेचा भगवा त्यांना पुसायचा आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले कि, शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. तसेच पुढे ते म्हणाले कि कोर्टावर माझा विश्वास आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाला सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी. यासाठी आग्रह धरण्याची गरज उद्धव यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!