Share

Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता थेट धनुष्यबाणावर येऊन थांबला आहे. दोन्ही गटांकडून धनुष्यबाणावर आपापला दावा ठोकला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण आपल्याकडेच राहील अशी ग्वाही शिवसैनिकांना दिली आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार कायद्याच्या मार्गाने धनुष्यबाण आमच्याकडे राहील असे सांगत आहेत. धनुष्यबाणाची लढाई निवडणूक आयोगाकडे पोहोचली आहे. त्यामुळे या दोन्ही गटांना कागदी पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. यानंतरच शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत निर्णय समोर येईल. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही धनुष्यबाणासाठीची लढाई कायदेशीर पद्धतीनेच लढू असे म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदे गटाकडे जाणार की ठाकरेंकडेच राहणार याबाबत पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, “शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना आमचीच आहे, असा दावा केला आहे. आयोगाने आम्हाला याबाबत पत्र पाठवून आमची बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही आमची बाजू मांडणार आहोत.” असे देसाई यावेळी म्हणाले.

देसाई पुढे म्हणाले की, “शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे करत आहेत. शिवसेनेला एका पद्धतीची घटना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हापासूनची ती घटना सुरू आहे. वेळोवेळी त्यात बदल केले गेले. त्याप्रमाणे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारीणी काम करते. पक्षाच्या घटनेनुसार सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे फक्त उद्धव ठाकरे यांनाच आहेत. हे सर्व निवडणूक आयोगाकडे मांडले जाईल,” असेही देसाई म्हणाले.

“एकनाथ शिंदे गटातील काही लोक शिवसेनेचा धनुष्यबाण आमचा असल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यांच्या या दाव्याला काहीही अर्थ नाही. याबाबत कायदे तज्ञांनी अनेक वेळा त्यांची मते मांडली आहेत. सर्वाधिकार हे मूळ पक्षालाच असतात. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हा शिवसेनेकडेच राहील आणि नेतृत्वही उद्धव ठाकरेच करतील, असेही देसाई यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. मात्र ही सत्ता कायम राखण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणाची लढाई जिंकावी लागणार आहे. असे न झाल्यास एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!