Share

Uddhav Thackeray : “हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत”; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray मुंबई : शिवसेना पक्षाचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल. असा वेळी शिवसेना पक्ष पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. मात्र यानंतर पुन्हा नव्याने पक्षबांधणीसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी बंडखोरांवर सडकून टीका करण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधलाय.

मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. तसेच पुढे ते म्हणाले कि कोर्टावर माझा विश्वास आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाला सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी. यासाठी आग्रह धरण्याची गरज उद्धव यांनी व्यक्त केली आहे.

तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणले कि, वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!