मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने 17 नोव्हेंबरला रोजी फरारी गुन्हेगार घोषित केले आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांचे वकील पुनीत बाली त्यांच्यावतीने न्यायालयामध्ये युक्तीवाद करत असताना त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. फरार घोषित केलेले परमबीर सिंग हे भारताबाहेर गेले नसून ते भारतातच आहेत, असा गौप्यस्फोट वकील पुनीत बाली केला आहे. परमबीर सिंग यांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयाला माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंग समोर येत नाहीत. पुढील 48 तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर न्यायालयात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.
खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटी यांना न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना दणका दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित
- हे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार आहे- सुधीर मुनगंटीवार
- एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता; परिवहन मंत्र्यांची ‘पॉवर फुल’ बैठक
- ‘दारूच्या दुकानांबाहेर ना गरिबी दिसते, ना तिथे कुणी अनुदान वा आरक्षण मागते’
- ‘कंगनाला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा,’ शीख समुदायाची संतप्त मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

