मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील स्कॉच व्हिस्कीची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.
या सरकारचा निर्यण कधी हर्बल वनस्पती वाल्यांना समर्पित आहे. कधी क्रुझ पार्टीवर सेवन करणाऱ्यांना समर्पित आहे. आता तर अद्भूत निर्णय केला आहे. 300 टक्के आयात शुल्क असणारी जी दारू आहे ते शुल्क 150 टक्क्यांनी घट केली, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाहीत. गाडीला उर्जा देणारं तेल आहे त्या तेलावर 1 पैसा कमी करा या सरकारचा निर्यण कधी हर्बल वनस्पती वाल्यांना समर्पित आहे. कधी क्रुझ पार्टीवर ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना समर्पित आहे. आता तर अद्भूत निर्णय केला आहे. 300 टक्के आयात शुल्क असणारी जी दारू आहे ते शुल्क 150 टक्क्यांनी घट केली, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.यला तयार नाही. पण यांच्या मताने बेवड्यांना उर्जा देण्यासाठी त्यांनी दीडशे पट दर कमी केला. हे सरकार महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचा संकल्प करुन जनतेचा सूड उगवत आहे. भ्रष्ट राष्ट्र केलं. हे सरकार समर्पित सरकार आहे, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवारांनी राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे. जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. असा आरोपही यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.
हे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार आहे..!#MVA pic.twitter.com/1wrTHbt2FJ
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) November 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दारूच्या दुकानांबाहेर ना गरिबी दिसते, ना तिथे कुणी अनुदान वा आरक्षण मागते’
- ‘कंगनाला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा,’ शीख समुदायाची संतप्त मागणी
- पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही मिळाली?, चंद्रकांत पाटील म्हणाले…
- एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेन, पण…- पंकजा मुंडे
- लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

