🕒 1 min read
पुणे : काल झालेल्या दसरा मेळाव्याकडे (Dussehra Melawa) सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मेळाव्यानंतर देखील नेत्यांची टिपा-टिप्पणी सुरुच आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत त्यांना खोचक टोला लगावला आहे.
“शिंदे यांच्या आरोपात काही अर्थ नाही. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. जे वक्तव्य केलंय, ते राजकीय हेतूने असल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. काहींची भाषणं नको इतकी लांबली. कोणाची ते तुम्ही ठरवा, असे अजित पवार यांनी म्हटले.
आता महाराष्ट्रातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे.कोणाच्या पाठिशी उभे राहायचं ? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे ?, याचा निर्णय जनतेने घ्यायचा असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे. ते आमच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. पण तेव्हा झेंडा आमचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा ही भावना त्यांनी कधी बोलून दाखवली नाही,” असे अजित पवार म्हणाले.
काल एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) तसेच उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) काय मार्गदर्शन झालं हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, मी देखील पाहिलेलं आहे. त्यांनी-त्यांनी त्यांचे विचार सगळ्यांसमोर ठेवले, दोन्ही कडे गर्दी होती, कशी होती हे देखील सर्वांना माहिती आहे, मिडीयाने लोकांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा शिंदेंच्या मेळाव्याला जाणाऱ्यांना माहितंचं नव्हते की ते कुठे चाललेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Madhuri Dixit | ‘झलक दिखला जा 10’ च्या मंचावर Kili Paul सह माधुरी दिक्षीत चे ठुमके
- BJP | “अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची…”; भाजपचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
- Sushmita Sen | टाळी वाजवतानाच्या पोज मधील सुष्मिता सेन चा ‘किन्नर’ भूमिकेतला लुक, बघून व्हाल थक्क!
- Nilesh Rane | “काल उद्धव ठाकरे यांची बायको आणि दोन शेंबडी पोरं सोडली तर…”, निलेश राणेंचा घणाघात
- Devendra Fadanvis | “ठाकरेंनी स्क्रिप्ट राईटर बदलावा”; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
