Share

एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता; परिवहन मंत्र्यांची ‘पॉवर फुल’ बैठक

Published On: 

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत अजूनही काही तोडगा काढण्यात आला नसल्याने एसटी कर्मचाऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र यावर आता उपाय काढण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची शरद पवारांसोबत वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) देखील उपस्थित आहेत. मात्र या बैठकीबाबत प्रचंड गुप्तता ठेवण्यात आली आहे. शरद पवारांसोबत या आंदोलनाविषयी चर्चा होत असल्याने आता लवकरच यावर मार्ग निघण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, अशी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण शक्य नाही, असं राज्य सरकारकडून सांगितले जात आहे.

तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सेवा समाप्ती करू, असा इशारा देखील सरकारने दिला. त्यामुळे एसटी कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी दाखल होत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हालणार नाही, असा पावित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सध्या या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!