मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या या भाषणावरून शिंदे गटाच्या नेत्या व माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
त्या म्हणाल्या, शिल्लक सेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला, यामध्ये कोणीतरी एक ताई भाषण करत होत्या. त्या ताई दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून आयात करून शिवसेनेत आणल्या गेल्या असल्याची घणाघाती टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. या ताईंनी शिवसेनेचा झेंडा कधी पकडला नाही. शिवसेनेच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नसतील पण, शिवसेनेत ज्यांनी आयुष्य घालवलं. अंगावर अनेक केसेस घेतल्या, त्यांच्यावर या काल आलेल्या ताई बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांना निष्ठा शिकवत होत्या, त्यांना गद्दार म्हणत होते. हे तुम्हाला कसं काय जमतं बुवा? देव जाणे?, असे म्हात्रे यांनी म्हंटल आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
नारायणराव, तुम्ही शहाणेसुरते आहात. पण तुम्ही बोलावं हिंदुत्वावर? विसरलात का नारायणराव, त्याच सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घालत गेली १० वर्ष आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्रीपद भोगली.. त्या तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन आम्हाला हिंदुत्वावर सांगायचं का?, असा आक्रमक सवाल अंधारे यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या कि, आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं. सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन निपटेन मी. पण दोन लोकांवर बोललं पाहिजे. किरण पावसकरांनी म्हणावं की आम्ही हिंदुत्वासाठी जातोय? तुम्ही शिवसेनेत होता..अजित पवारांनी चॉकलेट दिल्यावर राष्ट्रवादीत गेलात. मग मिंधे गटात गेलात. किरण पावसकर, तुमचं हिंदुत्व ६ वर्ष कुठे टांगून ठेवलं होतं?, असं देखील अंधारे म्हणाल्या.
आईला आणि बापाला विसरणाऱ्या औलादी इथे जन्माला आल्या आहेत. मी बोलण्याआधीच विरोधकांना पोटशूळ उठलाय. म्हणे हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेत सुषमा अंधारे कशा? तुमचंच चित आणि तुमचंच पट का? बीकेसीमधला इव्हेंट करणारे तुम्ही हिंदुत्व जपणारे का? ज्याला नांदायचंच नसतं, त्याला १२ मुद्दे सुचतात, असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “जनता सोबत असली तर किल्ला अभेद्य राहतो”; रोहित पवार यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- Kishori Pednekar | “एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनीच भाषण लिहून दिलं होतं”, किशोरी पेडणेकरांचा घणाघात
- Shivsena । शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दारुच्या बाटल्या वाटल्या? आणि ‘ती’ सोयही होती?; शिवसेनेचा खळबळजनक आरोप
- Maharashtra Rain Update | मराठवाड्यातील ‘या’ भागांसह राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर
- Explained | तर शिंदे गटाचे ४० आमदार निवडून येणे कठीण, अस्तित्वाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी जिंकला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

