Share

Sambhajiraje | दिड वर्षाच्या मुलावर टीका करणे ही संस्कृती नाही”; संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

जालना : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवावर टीका केली. यावरून त्यांना भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना चांगलेच फैलावर घेतले. अनेकाकांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता भाष्य केलं आहे. बदनापूर येथे आयोजित स्वराज्य संघटना प्रणित छावा क्रांतिवीर सेनेच्या मराठा दसरा मेळाव्याला उपस्थित असताना त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहास हा वैभवशाली आहे. मात्र या राज्यात सध्या राजकारणाची पातळी कमालीची खाली आली आहे. काल – परवा झालेला दसरा मेळाव्यात लोकांना चांगल्या विचारांची देवाण – घेवाण होईल असे अपेक्षित असताना त्यात खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दिड वर्षाच्या मुलावर टीका करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती  नसल्याचं संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले.

अगदी दिड वर्षाच्या मुलावर टीका करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, महाराष्ट्रातील लोकांना खोके व गद्दार असे शब्द जर ऐकण्यास मिळत असतील तर राजकारण कोणत्या थराला जात आहे, याचे भान ठेवणे गरजेचं असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण करायचे आहे. ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य’ असा आमचा उद्देश्य आहे. असंदेखील ते म्हणाले.

मला जे प्रेमाने बोलवतात तिथे जाणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोहीम फत्ते झाल्यानंतर त्या ठिकाणी ठाणेदार नेमायचे त्याच धर्तीवर आम्ही स्वराज्य संघटनेचे शाखा प्रमुख नेमत आहोत. विस्थापित, कष्टकरी, शेतकरी अशा विविध समाज घटकांसाठी आमची संघटना काम करणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!