🕒 1 min read
मुंबई : कंगना रणौत( Kangana Ranaut) ही अभिनेत्री असली तरीही ती वारंवार राजकीय वक्तव्य किंवा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कंगनाने भारताच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर लगेच कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही टीका केली. तिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
नुकतेच तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर बॉलिवूड अभनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत इंदिरा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.
इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिले होते की, ‘खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं.’
‘अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,’ असंही कंगनाने सांगितलं. यामुळे कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा (Manjinder Singh Sirsa) यांनी कंगनावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. ‘या अभिनेत्रीला तुरुंगात टाका किंवा वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा, कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिची मानसिक स्थिती स्पष्टपणे दिसत आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Our delegation has reached Mumbai & we will be at Khar Police Station today at 11.00 AM to file complaint against Actress Kangana Ranaut for her hateful communal remarks
After that, the delegation will reach Maharashtra Secretariat to meet Hon'ble State Home Minister at 1.00 PM pic.twitter.com/0DjaLx5m81— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) November 22, 2021
मनजिंदर सिरसा कंगनाविरोधात मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहे. नुकतेच त्यांनी ट्विट करत लिहिले की, आज सकाळी ११ वाजता मुंबई, खार पोलीस स्टेशनमध्ये कंगना रनौतच्या विरुद्ध चुकीच्या टिप्पणीसाठी तक्रार नोंदवणार आहे. यासाठी आज दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्र सचिवालयात माननीय गृहमंत्री यांना भेटणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
