Share

‘दारूच्या दुकानांबाहेर ना गरिबी दिसते, ना तिथे कुणी अनुदान वा आरक्षण मागते’

Published On: 

🕒 1 min read

तिरुअनंतपुरम : देशात सर्वाधिक टोकाचे वाद काही निवडक मुद्द्यांवरुन होताना दिसतात. आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी असो की उद्योग-व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही कामात सवलती, अनुदान किंवा आरक्षण मिळवण्यासाठी झटत असतात. यासाठी विविध समाजिक संघटनांच्याकडून वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी आंदोलने देखील होत असतात. परंतु दारूचे दुकान हे एकमेव ठिकाण असे आहे की तिथे कुणी सवलत मागत नाही, अनुदानही मागत नाही किंवा आरक्षण ही मागत नाहीत, असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

दारूच्या दुकानांबाहेर उभे असलेले मद्यपी ‘समतावादी’ आहेत. विशेष म्हणजे कोणीही कोणत्याही अनुदानाची किंवा आरक्षणाची मागणी करत नाही. तसेच, सर्व ग्राहक अशा दुकानांबाहेर धीराने आणि शांततेने रांगा लावताना दिसतात. आणि आपला नंबर येण्याची वाट पाहत असतात, असं केरळ उच्च न्यायालयाने एका निकालामध्ये म्हंटल आहे.

दारूच्या गुंत्या बाहेर गरिबी दिसत नाही. तेथे कोणालाही अनुदान किंवा आरक्षण नको आहे. हे सर्व जण अतिशय समतावादी आहे. प्रत्येकजण शांतपणे आणि संयमाने रांगेत उभा आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, या दुकानांबाहेरची गर्दी कमी करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे ‘वॉक इन शॉप’ होय. त्यासाठी इतर कोणत्याही दुकानाप्रमाणे बनवा. तसेच न्यायालयाने म्हटले की, दारूच्या दुकानांबाहेर लांब रांगा असल्याने अनेक सभ्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ किंवा कामाच्या ठिकाणी अशी दुकाने नको आहेत, असं न्यायमूर्ती दिवाण रामचंद्रन म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!