🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (PAK vs WI) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे रविवारी मुलतानमध्ये खेळला गेला. मात्र, शहरातील वादळी धुळीमुळे सामना काही काळ थांबला होता. पहिल्या डावातील ३३व्या षटकानंतर कमी प्रकाशामुळे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना काही काळ पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानचा संघ १५५/५ धावांवर खेळत होता. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा खराब हवामानामुळे प्रत्येक डाव ४८ षटकांचा करण्यात आला.
त्यानंतर वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू चेहऱ्यावर मास्क घालून मैदानात दिसले. खेळाडूंनी कोविड-१९ प्रोटोकॉलमुळे मास्क घातले नव्हते तर वादळी धुळीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी असे केले. पाकिस्तानने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे वेस्ट इंडिजचा ५३ धावांनी पराभव करत मालिका ३-०ने जिंकली.
https://twitter.com/sportstigerapp/status/1536218274689495040
प्रथम खेळताना पाकिस्तानने ९ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ३७.२ षटकांत २१६ धावा करून बाद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान आणि इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, फखर जमान ३५ धावा करून बाद झाला. बाबर आझम एक धावा करून बाद झाला आणि पाकिस्तानची परिस्थिती थोडी बिकट झाली. इमाम-उल-हक सलग तिसरे अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला आणि ६२ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे पाकिस्तानचा निम्मा संघ ११७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इथून खुशदिल शाह आणि शादाब खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या २००च्या पुढे नेली. खुशदिल ३४ धावा करून बाद झाला पण शादाबने अर्धशतक झळकावत ८६ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. अशाप्रकारे पाकिस्तान संघाने ४८ षटकांत ९ बाद २६९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने प्रथम काईल मेयर्सची विकेट गमावली. तो ५ धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजने एकामागून एक विकेट्स गमावल्या अकील हुसेन हा एकमेव फलंदाज होता ज्याने ६० धावा केल्या. अशाप्रकारे ३८व्या षटकात २१६ धावांवर विंडीजचा डाव आटोपला. पाकिस्तानकडून शादाब खानने ४ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
