Share

“..पण त्यामुळे आकाश कोसळले काय?”, आगामी विधान परिषद निवडणुकीवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Published On: 

मुंबई: राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोब फुटले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण त्यामुळे आकाश कोसळले काय? मुंगीने मेरू पर्वत गिळला काय? छे, छे! असे अजिबात झाले नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष व छोटया पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्याचे गणित भाजपच्या बाजूने गेले व त्याचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले, अर्थात जो जिता वही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात,  एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!