Share

“एक दिवस सत्य बाहेर येणार” ; सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज (१३ जून) वाढदिवस आहे. यानिमित्तच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह याने २०२० साली आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले होते.

“आज १३ जून आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे तर १४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू. १३ जून २०२० रात्री १ वाजता पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं. ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला एंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरच आज निलेश राणे यांनी पुन्हा एकदा हा विषय समोर आणला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!