मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे जाहीर केली आहेत. “आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांचा अपमान करण्याचा आमचा मानस नाही. कारण आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील.” अशी टीका राऊतांनी केली होती. आता यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
“संजय राऊत दोन दिवसासाठी ईडी मागताय जस 2 हजार उदार मागताय. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
संज्या राऊत दोन दिवसासाठी ईडी मागतोय जसा 2 हजार उदार मागतोय/… अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
दरम्यान, “राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने डावललं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंबाबत चिंता व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण या महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी मुंडे यांचा मोठा हात आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “..पण त्यामुळे आकाश कोसळले काय?”, आगामी विधान परिषद निवडणुकीवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय
- ENG vs NZ : नाद नाद नादच..! जो रूटनं पुन्हा ठोकलं शतक; विराट आणि स्मिथची केली बरोबरी!
- IND vs SA : भारताचं दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांचं लक्ष्य; ‘फिनिशर’ दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण खेळी!
- PAK vs WI : आपली बॅटिंग भारी अन् बॉलिंग लय भारी..! ४ विकेट्स घेत निकोलस पूरननं उडवली पाकिस्तानची भंबेरी


