टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधीचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व काही जिल्ह्यांमध्ये धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातल्या नेत्यांनीच ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर केले आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी वाईट काळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी नेते गेले आहेत. मात्र कार्यकर्ते आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी पुन्हा उभी राहणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, नेते पक्षांतर करत आहेत. मात्र पवारांवर निष्ठा असणारे कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर आहेत. स्वतःच्या विकासासाठीचं नेते पक्षांतर करत आहेत. असे असले तरी कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे याच कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष निवडून येईल, असे रोहित पवार म्हणाले. तसेच सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीय, अशी टीका रोहित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच आरोप – प्रत्यारोप होत आहेत. सोलापूरच्या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केल असा सवाल केला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना चांगलेचं लक्ष्य केले आहे. आज शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही अमित शहांच्या या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. शिक्षण, क्रीडा , सहकार, कृषी, संरक्षण या सर्व क्षेत्रात पवारांनी उल्लेखनीय काम केल आहे. मात्र ते भाजप नेत्यांना दिसत नाही. असे ते म्हणाले आहेत.
- ‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’
- ‘सरकार किती वेळा खोट बोलणार ? शेवटी मंदीचं वास्तव समोर आलचं’
- कॉंग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
- कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे : सुशीलकुमार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

