मुंबई : राज्यात सध्या सण-उत्सवाला सुरवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर मांसाहार प्रेमींनी चिकन, मटण आणि मासे विकत घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सध्या अनेक भागात दिसत आहे. मात्र यासाठी देखील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
याआधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचाच परिणाम जीवनावश्यक गोष्टींवर देखील होत आहे. भाजीपाला, दुध, तेल आणि आता मटण, चिकन तसेच मासळीच्या दरात देखील वाढ झाली आहे. मटण आणि चिकनच्या दरात जवळपास 20 रुपयांनी वाढ झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या उपवासानंतर अनेक नागरिक मांसाहारकडे वळाली, मात्र आपल्या जीभीचे चोचले भागवण्यासाठी खवैय्यांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मासे आणि चिकन- मटणमध्ये झालेली ही दरवाढ पाहता खानावळ आणि हॉटेलमध्ये काही पदार्थांच्या दरांतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास
- भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय
- ‘अजितदादांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?’
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

