🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर का झाले मग. पक्षातील इतर लोकांना पुढे का नाही केलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला.
‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मीच त्यांचा हात हातात घेतला आणि वर केला. आणि सांगितलं की, हेच मुख्यमंत्री होणार’, असं शरद पवार म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांच्या वक्तव्यावरुन आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री व्हायची त्यांना इच्छा नव्हती, मीच त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आग्रह केल. सदैव भावी…बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे.
मुख्यमंत्री व्हायची त्यांना इच्छा नव्हती, मीच त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आग्रह केल.
~ सदैव भावी
बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो. ????
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 17, 2021
महत्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
