Share

IPL 2022: बायो बबलमध्ये खेळाडूंचे होळी सेलिब्रेशन, आवेश आणि व्यंकटेश अय्यर थिरकले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. जगभरातील चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी एकूण १० संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. सर्व खेळाडू आपापल्या संघासाठी विजेतेपद मिळवण्यासाठी नेटमध्ये खूप घाम गाळत आहेत. दरम्यान बायो बबल मध्ये असलेल्या खेळाडूंनी होळी साजरी केली आहे. यावेळी व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान गाण्यावर थिरकताना दिसले आहे.

बायो बबल मध्ये असलेल्या दिल्लीच्या संघातील खेळाडूंनी हॉटेल मध्येच एकमेकांना रंग लावत सेलिब्रेशन केले. ज्यात कर्णधार ऋषभ पंत (rishabh pant) , यश धूल (yash dhul) आणि इतर खेळाडू मस्ती करताना दिसले. तर दुसरीकडे व्यंकटेश अय्यर (venkatesh iyer) आणि आवेश खान ‘हबीबी’ या गाण्यावर थिरकताना दिसले आहे. हे दोन्ही व्हिडीओ खेळाडूंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

 

 

बायो बबलमुळे खेळाडूंना बाहेरच्या जगाशी संपर्क करता येत नाही ज्यामुळे खेळाडूंनी नियमाचे पालन करत आपापल्यातच सेलिब्रेशन केले आहे.आयपीएल स्पर्धेची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता यांच्या विरुद्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!