नागपूर : भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याचे समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात ही बैठक झाल्याचे म्हंटले जात आहे. या वेळेस भाजपचे अनेक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भाजपची कामगिरी समाधानकारक असल्याने ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्षाने कंबर कसली असून सर्व पक्ष हे त्यांच्या पूर्ण ताकदीने निवडणुकांची तयारी करतांना दिसत आहे. सध्या राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार असल्याने आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकावर या पक्षाने चांगली कामगिरी केली.
जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसने उत्तम कामगिरी केल्याने, साहजिकच भाजपसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. भाजपचा गड समजला जाणाऱ्या नागपूरमध्ये कॉंग्रेस पक्षाने मुसंडी मारल्याने त्यासाठी भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे, कुठे कोणत्या व्यक्तीला जबाबदारी द्यावी या विषयावर गडकरी – फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उशिरा का होईना आलं शहाणपण! पाकिस्ताननं जर्सीवर लिहिलं भारताचं नाव
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

