नवी दिल्ली : टी -20 वर्ल्ड कप 2021 ची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. टी २० वर्ल्ड कप पाच वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये टी -20 वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आला होता. यंदा टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. यावर्षी टीम इंडियाला आपला दुष्काळ संपविण्याची नक्कीच इच्छा आहे कारण २०१३ पासून भारताने आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही.
दरम्यान, येत्या 24 ऑक्टोबरला सर्वांच्या भारत आणि पाकिस्तान या दोन मित्र संघात होणाऱ्या महामुकाबल्यावर असणार आहेत. या सामन्यापूर्वीच आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सामन्यापूर्वीच प्रतिकिया येण्यास सुरुवात झाली आहे. क्रिकेटप्रेमी आत्ता पासूनच सोशल मीडियावर सक्रिय झालेले दिसत आहते.
मात्र, यापूर्वीच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने या सामन्याच्या दिवशी सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे सांगितले आहे. सामन्यादरम्यान खराब वातावरण टाळण्यासाठी सानियाने हा निर्णय घेतला आहे. जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला होता. तेव्हा सोशल मीडियावर सानियाला जोरदार ट्रोल केले जाते. कारण तिचा पती शोएब मलिक पाकिस्तानकडून खेळतो आणि सानिया भारताची आहे.
https://www.instagram.com/reel/CVFkcBzjzDa/?utm_source=ig_web_copy_link
सानियाने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने लिहिले आहे की, ‘भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी वाद टाळण्यासाठी मी सोशल मीडियावरून दूर जाणार आहे. बाय बाय.’ सानियाचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

