Share

सावधान! रंगपंचमीला ‘हे’ रंग ठरू शकतात घातक…

Published On: 

मुंबई : होळीचे रंग अधिक गडद दिसण्यासाठी त्यात बूट पॉलिश, ऑइल पेंट व हेअरडायही मिसळतात. मात्र त्यामुळे त्वचेचे विकार, केस गळणे, त्वचेवर सफेद डाग पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हल्ली क्रिस्टल व्हॉयलेट, ब्रिलियंट ग्रीन या रंगांचा वापर चेहरा रंगवण्यासाठी होतो. पण हे रंग घातक आहेत. त्यामुळे रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करताना सावधगिरी बाळगा, असा सल्ला त्वचा व नेत्र तज्ज्ञांनी दिला आहे.

डोळ्यांना धोका
‘रंगात कधी तरी रांगोळी किंवा संगमरवराची पावडर मिसळतात. ही पावडर डोळ्यात गेल्यास गंभीर स्वरुपाची इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा सण साजरा करताना सावधगिरी बाळगा’, असा सल्ला हॉस्पिटलच्या सौंदर्यतज्ज्ञ डॉ. लीला जैन यांनी दिला. पाण्याने भरलेला फुगा डोळ्यावर आदळला तर डोळ्याला अपाय होतो.

औद्योगिक रंगांपासून सावधान
अनेकदा रंगांच्या डब्यावर ‘केवळ औद्योगिक वापरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख असतो. पण जल्लोश करताना या इशाऱ्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. हे रंग शरीराला अतिशय घातक आहेत.

पाणी जपून वापरा
कृत्रिम रंग लावले तर साफ करताना पाण्याचाही जास्त वापर करावा लागतो. चेहरा किंवा हाताला लागलेला कृत्रिम रंग साफ करताना काही जण शरीराला पेट्रोल, रॉकेल किंवा टर्पेंटाइन लावतात. त्याने त्वचेला अधिकच इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे फक्त नैसर्गिक रंग वापरा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!