🕒 1 min read
सोलापूर : भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबावर तोफ डागली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा आरोप केला आहे. तसेच शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल केला आहे. तसेच पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावं, असं आव्हानही दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.
अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, माझं शरद पवारांना चॅलेंज आहे की हे चोपडे मी उद्या ईडी आणि इनकम टॅक्सला पाठवणार आहे. सहकार न्यायालयाला ही पाठवणार आहे. यातला एकही कागद खोटा असेल पवार कुटुंबियांनी मला सिद्ध करुन दाखवावे, असंही सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
