Share

विधानसभेत पुन्हा गदारोळ: “तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेचे आज सभागृहात तिखट पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. कुणी तरी सांगितले 2 बिस्किटे देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. यावरुन सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

नितेश राणे असं बोलल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना रोखलं का नाही? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला भर सभागृहामध्ये केला आहे. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळावरुन सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.

मी अध्यक्षांची परवानगी घेतली आहे मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीससाहेब तुम्ही विधानभवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो. नितेश राणेंनी दादांना उद्देशून म्हटलं, दादा मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. असं नितेश राणे त्या क्लिपमध्ये बोलले. सुधीरभाऊ तुम्ही त्या क्लिपमध्ये दिसत नाहीत, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!