सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकूहल्ल्यानंतर सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी (Sindhudurg District Police) भाजप आमदार नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांची दोन वेळा चौकशी केली आहे. याप्रकरणी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
आता नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी तीन ठिकाणी फिल्डींग लावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं, असे आव्हान नारायण राणेंनी राज्य सरकारला दिले आहे.
याबाबत नारायण राणे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, ओबीसी आरक्षणासदंर्भात आज निर्णय येईल, त्यापूर्वी मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्या प्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ. नितेश राणे कुठं गेलेले नाहीत, ते अज्ञातवासात गेलेले नाहीत. असे नारायण राणे म्हणाले.
पुढे नारायण राणे म्हणाले, नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचं आहे ते करावं. ज्यांना मारहाण झाल्याचं सांगत आहेत त्यांना नितेश राणे यांच्याकडून कोणतीही मारहाण झाली नाही. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते विदर्भासाठी करणार असल्याचेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन


