🕒 1 min read
मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभ्यास करुन निर्णय देतो, असे अश्वासन महाविकास आघाडी सरकारला दिले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे.
पुढे राऊत म्हणाले, आता १२ आमदारांच्या शिफारशी. त्याला एक वर्ष पूर्ण झालं. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाटकात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता ५० टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
