🕒 1 min read
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांची चौकशी केली आहे. याप्रकरणी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते (Sachin Satpute) याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सातपुतेच्या चौकशीनंतर शिवसेनेकडून नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
मला याविषयी माहिती नाही, ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणे बरोबर नाही. तेथील 2 पालकमंत्री आहेत ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणं योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
- “इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”, राऊतांनी काढला राज्यपालांना चिमटा
- ‘महावितरण मंडळातील घोटाळे लपविण्यासाठी सरकारकडून…’, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
