🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. दरम्यान, महावितरण मंडळातील घोटाळे लपविण्यासाठी सरकार कडून राज्यात सोयिस्कर चित्र तयार केले जात आहे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) म्हणाले आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सदाभाऊ खोत यांनी ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की, ‘राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेती वीज पंपाच्या बाबतीत प्रचंड असंतोष आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आणि वेगवेगळ्या संघटना मोर्चे काढत आहेत. आणि विद्युत महामंडळ ऐन रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांची पिके वाळवतय अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे’, असे खोत म्हणाले आहेत.
महावितरण मंडळातील घोटाळे लपविण्यासाठी सरकार कडून राज्यात सोयिस्कर चित्र तयार केले जात आहे. #हिवाळीअधिवेशन #wintersession #maharashtra #ElectricityBill #farmers pic.twitter.com/rGucod3QUp
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 27, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’या राज्यामध्ये जवळजवळ शेती पंप धारक ४५ लाखांच्या आसपास असून त्यांची थकबाकी जी विद्युत महामंडळाने दाखवली आहे ती ४५ हजार कोटी रुपये आहे. मुळात शेतकरी वीज वापरतो किती तर ३१% आणि वीज गळती १५ % , असे विद्युत महामंडळाच म्हणणं आहे. परंतु प्रत्येक्षात वीज गळती ही ३०% आहे आणि शेतकरी विजेचा वापर फक्त १५% करत आहे. एका बाजूला या महामंडळाचा अंधाधुंदी कारभार,वितरणामधील गळती,त्यांच्या चोऱ्या,भ्रष्टाचार हे सगळं लपवण्यासाठी सोयीस्करपणे एका बाजूला शेतकरी जास्त वीज वापरात आहे अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले जात आहे आणि त्यांच्या चोऱ्या त्यामध्ये झाकून टाकल्या जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती
- ‘…त्यामुळे अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

