🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने विविध मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली होती. मागण्या मान्य न झाल्याने भाजपने विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. यावेळी भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना (Aditya Thackrey) पाहून ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत शिवसेनेला डिवचले होते. यामुळे आता विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे.
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी ही मागणी केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणेंचे कान टोचले असून अशाप्रकारे कुणावर टीका करु नये, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंचा समाचार घेतला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सभागृहाच्या आत चुकीचं वर्तन केल्यास कारवाई केली जाते. अशा विधानाची तपासणी करण्यासाठी आमदारांची समिती नेमायला कुणाचीही हरकत नाही. असे अजित पवार म्हणाले.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत एक आमदारांची समिती नेमायला हवी, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. असं होणं चुकीचं असून सतत अशा कृती घडत असल्याने कारवाई करणं गरजेचं आहे. असंही मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- जो रूटने रचला इतिहास; केला ‘हा’ खास विक्रम
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
- “इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”, राऊतांनी काढला राज्यपालांना चिमटा
- ‘भारताला 350 धावांत गुंडाळले तर सामना जिंकू’; द. आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजाची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
