Share

महापरिनिर्वाण दिन : मुख्यमंत्री, राज्यपालांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Published On: 

मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन होणार आहे. त्याबरोबरच यूट्यूब, फेसबूक आणि ट्विटर वरुनही हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येईल. त्यामुळे लोकांनी चैत्यभूमीवर जमू नये, असं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!