🕒 1 min read
औरंगाबाद:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयी हॅटट्रिक साधली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एकच विमानात सोबत प्रवास केल्याचा फोटो समोर आला आहे.

काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तेव्हा आमदार सतीश चव्हाणही त्याच विमानात होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सतीश चव्हाण यांनी एकाच सीटवरून हा प्रवास केला. फडणवीस-चव्हाण यांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी यावेळी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा मोठ्या मतांनी पराभव केला.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- ‘स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जाते’, राऊतांचा भाजपवर घणाघात
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

