मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत, रिपब्लिकन टी.व्ही.चे संपादक अर्वण गोस्वामी, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिगत स्वातंत्याची गळचेपी होत असल्याची बोंब मारली जात आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या कणाकणात स्वातंत्र्य आहे.
पण विषय असा आहे की, स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जात आहे. इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली असा सिद्धांत जे मांडतात ते तरी आज वेगळे काय करीत आहेत? स्वातंत्र्याची व्याख्या काय असा सवाल रोखठोकमधून संजय राऊत यांनी विचारला आहे.
तसंच, ‘सुडाचे हत्यार म्हणून या संस्थांचा वापर सुरू आहे. सूडबुद्धीने वागणारे सत्ता उबवू शकतात, पण राष्ट्र चालवू शकत नाहीत’ अशी टीकाही राऊतांनी केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी ईडी चौकशी, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि कंगना रनौत प्रकरणावरून भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
‘भाजपचे पुढारी केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयाच्या प्रतिष्ठेला जिवापाड जपत आहेत, पण या उपसिद्धांतात कसा फोलपणा आहे हे अलीकडच्या घटना, घडामोडींवरून दिसत आहे. खरे म्हणजे सत्ताच महत्त्वाची. त्यापुढे भाजपला कशाचीच पर्वा नाही, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे ती धोक्याची घंटाच आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी पुन्हा घोडेबाजार सुरू झाला आहे व महाराष्ट्रातही त्यासाठी विविध स्तरांवर राजकीय खानावळी व स्टॉल्स उभे केले आहेत.
या स्टॉलवर कोणी फिरकला नाही म्हणून ईडीसारख्या संस्थांना पकडून स्टॉलवर जबरदस्तीने लोक आणण्याचा प्रयोग सुरू झाला. भाजपची केंद्रीय सत्ता असे बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे की, आम्ही सर्व सत्ताधीश आहोत. सर्वोच्च न्यायालयापासून ते सर्व स्तरांवरील तपास यंत्रणांवर फक्त आमचीच हुकमत चालते. आम्ही तुम्हाला रगडू शकतो. तेव्हा आमच्या स्टॉलवर रांग लावून उभे राहा’ अशी टीका राऊत यांनी सेनेवर केली.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’
- पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्यापासून कडक संचारबंदी!
- ‘सरकार आजचं दुखणं उद्यावर ढकलत आहे’; एमपीएससी परीक्षांच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
