Share

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस

Published On: 

मुंबई : आज(6 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील जवळजवळ नियमीत खेळाडू झाला आहे. भारताकडून त्याने आत्तापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून यात 1869 धावा आणि 213 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने 168 वनडे सामन्यात 2411 धावा आणि 188 विकेट्स घेतल्या आहेत. तर 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 217 धावा आणि 39 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.

जडेजाने 19 वर्षांखालील 2006 आणि 2008 असे 2 विश्वचषक खेळले आहेत. तसेच दोन्ही वेळेस भारतीय संघ अंतिम सामन्यात दाखल झाला होता. पण 2006 ला भारतीय संघ पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यावेळी 2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा हे देखील जडेजाबरोबर होते. जडेजाने नंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 चा 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला. या विश्वचषकात तो भारताचा उपकर्णधार होता. तसेच हा विश्वचषक युवा भारतीय संघाने जिंकला होता.

जडेजाला शेन वॉर्नने ‘रॉकस्टार’ असे टोपननाव दिले होते. तसेच भारतीय संघातील खेळाडू त्याला ‘जड्डू’ या टोपननावाने बोलवतात. तसेच एमएस धोनीने सोशल मीडियावर अनेक ट्विट करुन जडेजाला ‘सर’ हे टोपननाव दिले आहे.

जडेजा 12 या क्रमांकाला खूप लकी मानतो. त्यामुळे त्याने त्याचे रेस्टोरंटही 12 डिसेंबरला सुरु केले होते. तसेच त्याचा जन्मही डिसेंबर या वर्षातील 12 व्या महिन्यात झाला आहे आणि त्याने कसोटी पदार्पणही डिसेंबर 2012 मध्ये केले आहे. 2013 मध्ये जडेजा आयसीसीच्या वनडेत गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता. असा पराक्रम करणारा तो कपिल देव, मनिंदर सिंग आणि अनिल कुंबळे नंतरचा चौथाच भारतीय गोलंदाज होता. 2017 मध्ये तो कसोटीतही गोलंदाजी आणि अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!