🕒 1 min read
Chandrakant Patil । मुंबई : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. तरीही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. शाई फेकल्या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब ईचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यांच्यावर भादवि कलम 307 ,353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 “महाराष्ट्र” महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) आणि 135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, मनोज गरबडे याच्यासह तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनोज हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आलं होतं. या तिघांनाही आज जामिनावर सोडण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN 1st Test | ऋषभ पंतचे अर्धशतक हुकले, तर रचला ‘हा’ इतिहास
- Chhagan Bhujbal | “पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर…”; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांनी राज्य सरकारला सुनावलं
- Ranji Trophy | रणजी पदार्पणामध्ये अर्जुन तेंडुलकरचे शानदार अर्धशतक
- Sushma Andhare | “उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी करावी”; मागणी कोणी आणि का केली?
- IND vs BAN 1st Test | सचिन-गावस्करला मागे टाकत अवघ्या 10 धावांमध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
