Share

Devendra Fadanvis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadanvis | मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

शाईफेक करणाऱ्या ( Throwing ink) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी  (Police Custody) सुनावली आहे. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे Manoj Garbade) या कार्यकर्त्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनोज गरबडे यांच्यावर लावण्यात आलेले कलम ३०७ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ११ पोलिसांचे निलंबन सुद्धा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संबंधित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफीनामा जाहीर करत आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला महापुरुषांचा अपमान कधीच करायचा नव्हता, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच आपल्यावर शाईफेक करणाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी आणि पोलिसांचं निलंबन मागे घ्यावं, अशी विनंती सरकारकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!