🕒 1 min read
Pune Bandh | पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील व्यापारी संघटना फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (FATP) चे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी बंदला पाठिंबा दिला असून दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी देखील या बंदला पाठींबा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर देखील राज्यपाल आणि भाजप नेते त्रिवेदी यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच सर्व विरोधी पक्षांनी एकमताने बंदची हाक दिली आहे. या बंदला विविध व्यापारी संघटना, मराठा सेवा संघ, मुस्लिम संघटना, दलित संघटना, ऑटो युनियन, बँक युनियन आणि विविध संघटणांनी पाठिंबा दिला आहे.
राज्यपाल गेल्या महिन्यात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते. “जर कोणी विचारले की तुमचा आयकॉन कोण आहे, तर तुम्हाला कोणाच्या शोधात बाहेर पडण्याची गरज नाही. ते तुम्हाला इथे महाराष्ट्रात सापडतील. छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले आहेत. तुम्ही नवीन लोकांना रोल मॉडेल म्हणून पाहू शकता. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत,” असे विधान राज्यपालांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Ranji Trophy | अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माला स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी
- Nora Fatehi | नोराने केला जॅकलीनवर मानहानीचा आरोप
- Maharashtra Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकरी पुन्हा सापडला संकटात
- Zika Virus | कर्नाटकमध्ये 5 वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागणं
- Uddhav Thackeray | नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा ठाकरे गटाकडून समाचार; म्हणाले, “इथली जनता त्यांचा माज…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
